Tuesday 16 June 2009

महेंद्रसिंग धोनी आणि लालकृष्ण आडवाणी
या पोस्टचं टायटल वाचून आश्चर्य वाटलं असेल किंवा दोन वेगवेगळी टायटल्स चुकून एकत्र आली, असं वाटून गेलं असेल. पण मुद्दामच हे पोस्टचं नाव असं दिलंय. एक तर मी या लेखात माझ्या परीनं या दोघांची तूलना करण्याचा प्रयत्न करणा आहे. (आणि दुसरं म्हणजे असली आर्बिट टायटल वाचल्यावर बरेच जण क्युरिओसिटीपोटी पोस्ट वाचतात....) असो... महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार... लालकृष्ण आडवाणी पार्टी विथ डिफरन्सचे कर्णधार... परवाच क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारताचा दारूण (खरं तर तीन धावांचा पराभव दारूण नव्हे... पण परिणाम दारूणच झाल्येत ना?) पराभव झाला. गेल्या महिन्यात अशाच 'मेन इन सॅफ्रॉन'चा देशभर पराभव झाला होता. आता धोनीला जशा शिव्या घातल्या जातायत तशाच त्या आडवाणींनापण दिल्या जातायत... धोनी हा अधिक लाडका असल्यामुळे असेल कदाचित, पण त्याच्याप्रमाणे आडवाणींच्या प्रतिमा भाजप कार्यकर्त्यांनी अजूनतरी जाळलेल्या नाहीत. पराभवाला कोणीच वाली नसतो... त्यामुळे भारतीय संघ आणि संघाची भारतीय जनता पार्टी यांच्या पराभवाचे वाली अनुक्रमे धोनी आणि आडवाणीच आहेत... धोनीचे निर्णय चुकले असतील... त्यानं जडेजाला वर पाठवलं असेल... त्यानं टॉस जिंकून बॉलिंग घेतली असेल... त्यानं बॅटिंगल्या आल्यावर बॉलला आभावानंच बॅट लावली असेल... आडवाणींनीही स्वखुषीनं किंवा अपरिहार्यता म्हणून मोदींना वर पाठवलं असेल... किंवा वरूण गांधीच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हिंदुत्त्ववादी गोळीबार केला असेल.... म्हणून काय झालं? पराभवाला हे दोघंच जबाबदार आहेत, असं कुठंय.... स्वतः जडेजा, सगळे बॉलर्स, सगळे फिल्डर, सगळे बॅट्समन, मोदी, वरूण, जेटली, स्वराज, राजनाथ यांची काहीच चुक नाही असं आहे का? मग क्रिकेट हा धर्म मानणा-या देशात केवळ १५ दिवसांपूर्वी टीम इंडियाचा तारणहार वाटणारा धोनी इतका कसा मनातून उतरतो आणि महिन्याभरापूर्वी आडवाणी हेच वाजपेयींचे उत्तराधिकारी मानणारे भाजपतले ज्येष्ठ नेते अचानक त्यांच्या माथी पराभवाचं खापर का फोडतात? अर्थात क्रिकेट आणि राजकारणात असले प्रश्न विचारायचे नसतात, हे मला कळतं. कारण टिव्हीच्या दुकानात उभं राहून जो मॅच बघतो, तो खरा कॉमेंटेटर असतो आणि मतदार मतदानयंत्रातून मूकपणे जे सांगतो, तेच खरं असतं. बाकी सब झूट... आणि मग पुन्हा एकदा पराभवाचा वाली शोधण्याचा प्रयत्न हारलेल्या संघांमधले (म्हणजे टीम या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हे....!) लोक करतात. धोनी आणि आडवाणींना टार्गेट करणं हे त्याचच उदाहरण. पण यात एक सूक्ष्म फरक आहे. निदान धोनीच्या संघातल्या कोणी अजून तरी स्पष्टपणे त्याच्यावर तोंडसूख घेतलेलं नाही. भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय जनता पार्टीपेक्षा अधिक परिपक्व आहे, असं आता म्हणायचं का, ते तुम्ही ठरवा.

3 comments:

Anonymous said...

ब्लॉगर झाल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. इतके दिवस तू ब्लॉग कसा चालू केला नाहीस याचं मला आश्चर्यच वाटत होतं. पण आता तुझा ब्लॉग सुरु झालाय. घडणा-या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाचं एक मत असतं. त्याला ते मांडायचं असतं. कोणी ऐकेल किंवा ऐकणार नाही, याची फिकीर त्याला नसते. किंवा आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायची असते. ती कदाचित इतरांसाठी महत्वाची नसते. पण आपल्याला ती मांडायची असते. अशा सर्व गोष्टींसाठी ब्लॉग हा सर्वोत्तम पर्याय आहे. गेल्या दोन वर्षांपास्नं मी अनुभवतो आहे.
शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन.

आशिष चांदोरकर

Unknown said...

blog madhali pahilich mahiti wachniy aahe... tumchay blogchay marphat aamhala navnvin mahiti milat raho aani aamachay dhaynit bhar padat raho.... subhechay

संदीप दि.साखरे said...

हे धोनीचं प्रेम की अडवाणींबाबतचं जादा प्रेम..
अडवाणी आणि धोनी यांच्या पराभवाची तुलना होऊ सकत नाही.. कारण अडवाणींचा पराभव अधिक दारुण आहे..तीन धावांनी नव्हे..
असो.. छान सुरुवात.. या आमच्या राज्यात तुमचंही स्वागत असो..(साम नव्हे ब्लॉगच्या)