Saturday, 8 August 2009

झालो आम्ही एक पुन्हा...

झालो आम्ही एक पुन्हा...
मिळून आले निळे बावटे...
'विधाना'तही झाली एकी...
पाडून टाकू तिरंगी-भगवे...

सूर हाच उमटला बैठकित
सत्ता नकोच आम्हा तरीही
आम्ही सारी भावंडे हो...
भांडत असलो जरी कितीही...

'भीम'गर्जना करू आता हो...
फिरुनी एकदा उच्च स्वराने...
परतुनी आले सगळे बांधव....
राखी बांधतो याच कराने...

निळानिळा हा देश करूया...
या या रंगा घेऊनि या हो...
तिरंगी वसने उतरून ठेवा...
भले ही अंगे उघडी राहो...

'गवई' म्हणती 'आठवले' का..?
मैत्रीची उघडली 'कवाडे...'
'प्रकाश' नाही आला तरीही
कोण करेल आपुले वाकडे...?

'माये'ला त्या आणा इकडे...
आपल्यामध्ये ओढून घेऊ...
तिचा 'हत्ती'ही आपल्या रंगी...
निळा-निळा हो रंगून देऊ...

दुरूनी काही हसुन ऐकती...
ही सगळ्यांची भाषणबाजी...
आणि म्हणती नवे काय ते...
ही तर यांची जुनीच गोची...

भीमरायाचे नाव घेऊनी...
नाटक करती हे मैत्रीने...
शाहू-फुल्यांची आण भाकूनी...
जना फसविती हे खात्रीने...

हातामध्ये हात घालुनी...
जरी हे घेती आणा-भाका...
स्वार्थ सरता होतील यांच्या...
कपाळी आठ्या... वरती खाका...

5 comments:

ashishchandorkar said...

दुर्गेश सोनार यांच्यानंतर आता साम मराठी वाहिनीमध्ये तू दुसरा कवी तयार झाला आहेस. अर्थात, नवी मुंबईत म्हणजेच बेलापूर डेस्कला. कारण पुण्यात स्वप्निल बापट नावाचा आणखी एक कवी आहे. त्यामुळे आता तुम्ही तिघं मिळून एखादा काव्यसंग्रह काढू शकता. व्वा... होऊन जाऊ दे...

mala-watala-te said...

सॉरी... मी कवी नाही. मी फारफार तर वात्रटिकाकार होऊ शकतो. मला प्रेमकविता वैगरे करणं जमत नाही... हां... आता कवितासंग्रहाचं म्हणशील तर दुर्गेश आणि स्वप्नील हे दोघंही नावाजलेले कवी आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रित काव्यसंग्रह येऊ शकतच नाही... प्रोफेशनल जेलसी... यु.नो.? माझं काही तसं नाही. या दोघांनी कवितासंग्रह काढले आणि त्यात मला एखादं पान दिलं, तर त्यांच्या कवितांच्या वात्रटिका करून लिहू शकीन जास्तात जास्त. त्यापलिकडे जाऊन प्रेम-बिम कविता लिहिणं शक्य नाही. मी स्वतः वात्रट असल्यानं वात्रटिका चांगल्या करू शकतो, हे मात्र खरं....

Anonymous said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

बापरे... डायरेक्ट कविता....? वात्रटिका का असेना पण कवितेची वाट अवघड. जरा इकडेतिकडे झाली की विनोद होतो.... एम.जे.चं इन्स्पिरेशन कामी आलं बुवा.... छान छान. लगे रहो.. कविताही करते रहो.. पण प्लीज अधूनमधूनच!

जुई said...

hey dada aajch office madhye Paranjape mam ni tumchi kavita dili vachayala....saglyana khupch avadli...mastch lihili aahe tumhi...

tumcha blog suddha chan aahe...mam ni sangital tevhach tharval hot ki lagech net var pahayach....all d best to you....

[kalyan janata Bank HODC]